माणुसकीची भिंत पुसद महिला सदस्या कडून वृद्धाश्रमावर भाऊबीज साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- माणुसकीची भिंतीच्या महिला सदस्यां ह्या मागील सात वर्षापासून पुसद मधील बेघर अनाथ गरजू व वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत भाऊबीज सन साजरा करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड पुसद येथे जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता करून तिथे रांगोळी काढून पाटे मांडून वृद्धांना मायेने ओवाळू त्यांना टॉवेल टोपी नारळ करदोडे पेढा कपडे धोतर व हाताने बनविलेले फराळ आणि पोळी भाजी भात वरण बुंदीचे लाडूचे जेवण देऊन त्यांची विचारपूस करून भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

माणुसकीची भिंत च्या महिला सदस्या मागील सात वर्षांपासून वृद्धाश्रमामध्ये वृद्धांसोबत रक्षाबंधन व भाऊबीजीचा सण साजरा करतात तसेच उपजिल्हा रुग्णालय माणुसकीचे भिंत मदत केंद्र पुसद येथे व माणुसकीची भिंत शनी मंदिर येथे दिवाळीला गरजूंना व अनाथांना कपडे फराळ व जेवण देऊन दिवाळी साजरी करीत असतात हळदी कुंकवा निमित्त उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्ण महिलांना बाळाचे मालिश तेल पावडर डेटॉल साबण मास सॅनिटायझर अशी उपयुक्त मेडिकल किट मिठाई साडी व मुलांना कपडे देऊन हळदी कुंकवाचा सण साजरा करीत असता असे मानवी उपक्रम माणुसकीची भिंत महिला सदस्या राबवत असतात या उपक्रमासमाणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्या मोनिका जाधव,रेखा आगलावे,प्रियंका बेले,संजना राठोड,मेघा निळकंठे,ज्योती शेटे,वैष्णवी किरदात,भाग्यश्री सुरोशे,रेखा अग्रवाल,वंदना कदम शेतीनिष्ठ शेतकरी
दत्तात्रय जाधव , माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव, सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकजपाल भिंतीचे सदस्य शिवराम शेटे,देवानंद निळकंठे,आकाश शिंदे, धनंजय आघाम,प्रमोद ठाकूर,दीपक घाडगे,संजय अग्रवाल,महेश वानखेडे,सार्थक जांबुतकर,आदित्य जाधव क्रिश आगलावे भिराज निळकंठे ,युवान खामकर व इतर माणुसकीची भिंत शुभचिंतक उपस्थित होते

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….