माजी पंचायत समिती सदस्या रंजनाताई भेलके यांचे कडून वॉटर फिल्टर ची व्यवस्था ; अंगणवाडीतील लहान बालकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- जिल्हा परिषद व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करून त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टीने श्रीरामपूर पंचायत समितीच्या सदस्य रंजनाताई विजय भेलके यांनी वॉटर फिल्टर ची व्यवस्था केल्याने जनतेकडून त्यांचे आभार मानले जात आहे.
पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर गणातून बहुमताने विजयी झालेल्या सौ रंजनाताई विजय भेलके यांनी नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी पंचायत समिती मार्फत अथक परिश्रम घेतले. लोकांच्या वाटर फिल्टरसह घरकुलाच्या प्रश्नासाठी त्या नेहमीच सभागृहात प्राधान्याने प्रश्न मांडत होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणल्या व त्यांचे समाधान केल्याने आज त्यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणुन नावरूप प्राप्त झाले आहे. रंजनाताई यांचे सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र कौतुक सुद्धा होत आहे.
असाच एक प्रश्न सोडवताना त्यांनी पंधरावा वित्त आयोग निधीतून वाटर फिल्टर साठी लाखो रुपयांचा निधी आणून श्रीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक एक मधील अंगणवाडी ज्यामध्ये शेकडोंच्या संख्येने गरीब झोपडपट्टीतील मुले येतात त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था म्हणून वॉटर फिल्टर ची असलेली मागणी पूर्ण करून वॉटर फिल्टर बसविले. तसेच वार्ड क्रमांक तीन व सहा मधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शुद्ध पाण्याची व्यवस्थेच्या दृष्टीने वॉटर फिल्टर बसविले. या तिन्ही वॉटर फिल्टर चे उद्घाटन करून ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. या उपलब्ध बद्दल अंगणवाडी सेविका तथा शिक्षक वृंद व नागरिकांकडून पंचायत समिती च्या माजी सदस्य सौ रंजनाताई विजय भेलके यांचे अभिनंदन केल्या जात आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी श्रीरामपूर चे माजी सरपंच मिलिंद उदेपूरकर यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या माजी सदस्य रंजनाताई विजय भेलके यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास श्रीरामपूर ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच राजू डहाके, नारायण पुलाते, गोविंद कदम, नारायण पासवान, पिंटू वानखेडे, सामजिक कार्यकर्ते मारोती भस्मे, पत्रकार दिलीप खैरे, मारोती भस्मे, प्रवेश पांगरकर, राजू राठोड, नितीन रोकडे, नवल जयस्वाल, मुख्याध्यापक देशमुख मॅडम आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….