राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, राज्यमंत्रीही घेणार शपथ ; फडणवीसांची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
त्यामुळं आता या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळतेय हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आत्तापर्यंत राज्यात फक्त कॅबिनेट मंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्यमंत्री म्हणून कोणीही शपथ घेतली नव्हती, त्यामुळं पुढच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल हे पाहाणं औत्सुक्याचं असणार आहे. पण हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बच्चू कडूंची नाराजी दूर होणार का?
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदेंचं सरकार स्थापन होताच यामध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी आशा बच्चू कडू यांना होती. पण तसं घडलं नाही, त्यामुळं त्यांनी अनेकदा जाहीररित्या नाराजीही व्यक्त केली होती. पण आपल्याला मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळं पुढच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना संधी मिळतेय का हे पहाणं औत्सुक्याच ठरणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….