पशुधनाच्या वाहतुकीवर आणखी महिनाभर निर्बंध ; राधाकृष्ण विखे-पाटील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गोधनामध्ये पसरणाऱ्या लंपी या रोगावर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी पाळीव जनावरांच्या वाहतुकीसाठी अजून एक महिना निर्बंध राखले जाणार आहेत. राज्यात पशुधनास लंपी चर्मरोगाचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे.
अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यांमधील लसीकरण १०० टक्के झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार राज्यात सुमारे ८०.८६ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असून बाधित पशुधनापैकी एकूण 31179 पशुधन उपचाराने बरे झाले आहेत.
“राज्य शासनाने घेतलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेमुळे हा अजर आटोक्यात येत आहे. मात्र पशुधनाच्या वाहतुकीवर आणखी एक महिना निर्बंध ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत २५२८ पशुधनाचा मृत्यू झाला असल्याचे सचिंद्र प्रताप सिंह सिंह यांनी सांगितले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….