आठवलेंच्या ‘त्या’ वक्तव्याची प्रकाश आंबेडकरांनी इज्जतच काढली ; म्हणाले, काही महाभाग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केलं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजया दशमी दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता.
पण, बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं होतं. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी हे धक्कादायक विधान केलं होतं. मात्र, आठवलेंच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) जोरदार टीका केली.
आता अनेक गोष्टी चालल्या आहेत. कुणाचं तरी गुणगान गातात, कुणी लोटांगण घालतात आणि काही जण मंत्रिपद कायमचं टिकलं पाहिजे म्हणून येड्यासारखं बडबड करतात. विजया दशमीला (Dhamma Chakra Pravartan Din 2022) जाणीवपूवर्क विचारपूर्वक बाबासाहेबांनी हे पाऊल उचललं. कारण, जो बहिष्कृत वर्ग होता त्याचे बहिष्कृतपण निघाले पाहिजे, त्याला माणसाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याला समतेचा अधिकार मिळाला पाहिजे. त्याला इज्जतीनं जगता यावं. म्हणून त्यांनी बुद्धाच्या विचाराची कास धरली, असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी आठवलेंच्या (Ramdas Athawale) त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
प्रकाश आंबेडकर पुढं म्हणाले, आज काही महाभाग असे म्हणायला लागले की चुकून माकून बाबासाहेबांनी हा मार्ग घेतला. दुर्दैवानं जे-जे विचारवंत अशा नेत्यांच्या पाठीमागे उभे राहतात. मला त्या विचारवंताची कीव करावी वाटते. बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती विचारपूर्वक चालली. परंतु, त्या विचारपूर्वक उचललेल्या पावलाला स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी आता काही जण बाबासाहेबांचे ते पाऊल चुकीचं होतं, असं म्हणताहेत. अशा विचारवंताचा त्यांच्या नेत्यांचा आम्ही या जाहीर सभेमध्ये धिक्कार करतो, असं ते म्हणाले. अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….