मोठी बातमी….! ; अनिल देशमुखांना मोठा दिलासा, 11 महिन्यांनंतर जामीन मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई 04 ऑक्टोबर : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला.
कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास 11 महिन्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कारण सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळालेला नाही.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिल्यानंतर जामीन अर्जावर मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्यात आली होती. मात्र निकाल राखीव ठेवला होता. आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र अनिल देशमुख अजूनही कोठडीतच राहणार आहेत.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडी आणि सीबीआयकडून देशमुख यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर देशमुख यांच्यावर ईडीने गंभीर आरोप केले होते. देशमुख यांना जामीन मिळवण्यासाठी आटोकात प्रयत्न केला.
अखेर त्यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी ईडीने केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ द्यावा, असं ईडीने म्हटलं आहे. ही मागणी न्यायालयाने मान्य करत 13 तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे. म्हणजेच 13 तारखेपर्यंत ईडी हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ शकते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….