100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन, पण जेलमधून सुटका नाहीच, हे आहे कारण…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. 11 महिन्यानंतर देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पण, सीबीआयच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे देशमुख यांना जेलमध्येच राहावे लागणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील क्लबकडून 100 कोटी रुपये वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती. अखेर आज अनिल देशमुख यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाला आहे.
1 लाखांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र अनिल देशमुख अजूनही कोठडीतच राहणार कारण की सीबीआय चे प्रकरण प्रलंबित आहे.
तसंच, ED ने देशमुख यांच्या जामिनावर आक्षेप घेतला असून स्थगिती द्यावी अशी मागणी केली.
देशमुख यांना मिळालेल्या जामीन अर्जाला सुप्रीम कोर्टामध्ये आवाहन देणार आहे. याला मान्यता देत 13 तारखेपर्यंत ईडीला परवानगी दिली आहे. त्यामुळे ईडी आता 13 तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊ शकते. तर, अनिल देशमुख यांचं वय आणि वैद्यकीय अडचणीच्या मुद्द्यांवर जामीन मंजूर झाला आहे.
मात्र,ईडीला या निर्णयावर सुप्रीम कोर्टात दाद मागायची असल्यानं,या जामीन मंजूर अंमलबजावणीस 13 ऑक्टोबरपर्यंत कोर्टाची स्थगिती दिली आहे. 1 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक्यावर मंजूर झाला आहे. कोर्टाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहे. तपासात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्यास मनाई केली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख अजून CBI च्या कोठडीत आहे. लवकरच, CBI केसमध्येही जामिनासाठी अर्ज सादर करणार आहे. सचिन वाझे याच्या जबाबातील तफावत आणि अनिल देशमुख यांच्या वयानुसार असलेल्या आरोग्य अडचणी याचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला, अशी माहिती देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी दिली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….