यंदाचा दसरा मेळावा संजय राऊतांविनाच…! ; राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संजय राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी १० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
पत्राचाळ मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
१० ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.
संजय राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी १० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. जुलै महिन्यात अटक झाल्यानंतर तीनदा राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ११ लाख ५० हजार रुपये रकम राऊतांच्या घरातून जप्त (Seized) करण्यात आली. याबरोबरच व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी (Viral Audio Clip) संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असल्याने त्यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवली होती. यावरुन अनेक चर्चांना उधाण आले होते. दसरा मेळाव्याच्या आधी संजय राऊत बाहेर येतील अशी शिवसैनिकांनी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या या अपेक्षेवर पाणी फेरले आहे

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….