रोड रॉबरी प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने वाढवली ; पोलिसांनी २ धारधार शस्त्र केले जप्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
किराणा व्यवसायीक अनिल शर्मा यांना भरदिवसा प्राणघातक हल्ला करून लुटणाऱ्या आरोपींना पुन्हा न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.वाई बाजार , माहूर , आणि हिवरा येथून किराणा व्यवसायाची वसुली करून परतणाऱ्या किराणा व्यवसायिक अनिल शर्मा यांच्यावर पाळत ठेवून महागाव तालुक्यातील खडका ब्रिजवर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून रोख रखमेची बॅग हिस्कावली होती. या रोड रॉबरीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि महागाव पोलिसांना अवघ्या २४ तासात छडा लावला.त्यामध्ये वडसा, पडसा , काळी दौ.आणि पुसद येथून प्रत्येकी १ असे ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.त्यांच्याकडून रॉबरीतील तब्बल ३.२४ हजार रुपये पोलिसांना जप्त करण्यात यश आले होते. पोलिसांनी या सोनेरी टोळीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.मात्र ही कोठडी संपल्याने पोलिसांकडून आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आता पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.आता पर्यंत आरोपींकडून ४ लाख ९५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.त्यासोबत रोड रॉबरी मध्ये वापरण्यात आलेल्या २ दुचाकी आणि धारदार २ शस्त्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.मात्र यातील अजून काही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या शोधत असल्याचे पोलीस दलातून कळते.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’