रेशनधान्य घेणाऱ्यांसाठी शासनाने घेतला “हा” मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आपल्याला माहित आहे की, आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गरिब जनतेला आवश्यक असणाऱ्या गरजा भागवणं कठिण होत आहे. यासाठी सरकार नेहमीच गरिब जनतेसाठी कोणती-नाकोणती योजना काढतंच असते.
यामध्ये जनतेला खाण्यास धान्य मिळावे यासाठी शासनाने रेशनधान्य उपलब्ध करून दिलं आहे. अशातच शासनाने रेशनकार्डवर धान्य घेणाऱ्यावर एक निर्णय घेतला आहे. ज्या लोकांचे उत्पन्न जास्त असूनही जे रेशनधान्य घेत आहेत, अशा लोकांचं रेशेनधान्य बंद होणार आहे. अनेकजण रेशनकार्डवर स्वस्तात धान्य मिळतं म्हणून घेतात आणि घेतलेलं धान्य खासगी दुकानात किंवा व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना या धान्य मिळत नाही.
याच पार्श्वभूमिवर शासनाने हा नवा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे. शासनाच्या नव्या निर्णयानूसार येत्या 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे जे खरोखर गरिब लोक आहेत, ज्यांना धान्याची खरंच गरज आहे, अशा लोकांपर्यंत रेशनधान्य पोहचले जाईल. तसेच, धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी फिरून प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….