शिवसेनेचं ठरलं ; शिंदे गटाला देणार धक्का ; उद्धव ठाकरेंनी आखली नवी रणनीती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.
त्यामुळे आता शिवसेना पुन्हा मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना गणेशोत्सवानंतर राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेने यात्रेला सुरूवात होणार आहे. ठाण्यातील टेंभी नाक्यावर ठाकरे यांच्या सभा होणार आहे.
महाप्रबोधन यात्रेची सुरुवात आणि सांगता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे. यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनीही राज्यभरात दौरा करत बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेतल्या. यावेळी शिवसेनेने शक्ती प्रदर्शन केले आहे. आता पुन्हा शिवसेनेने दौरा सुरू केला आहे. त्यामुळे आता पुन्हा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमने सामने येणार आहे.
४० आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेने या ४० आमदारांविरोधात उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आमदारांनी पक्षाविरोधात केलेल्या कारवाईमुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी या याचिकेत मागणी केली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….