“सरकार वेळेवर निर्णय घेत नाही , हीच मोठी समस्या” ; नितीन गडकरींचा मोदी सरकारला “घरचा आहेर”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- ”वेळ ही अत्यंत महत्त्वाची असून विकासकामांबाबत सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या आहे”, असे वक्तव्य करत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एकप्रकारे मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
ते नॅशनल कंव्हेशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स ( NATCON 2022 ) या कार्यक्रमात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
मुंबईत नॅटकॉन २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. ”बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही”, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले.
”भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करत येईल. कोणतेही प्रकल्पासाठी त्यांची गुणवत्ता, त्याची किंमत आणि त्याला लागणारा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो, असेही ते म्हणाले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….