महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारणार ; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आहे.
राज्यातील १२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यामुळे वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, आता बैठकीत साहसी खेळाचा निर्णय घेतला. खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा नागरिकांना फायदा होईल. असे महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत, असंही महाजन म्हणाले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….