मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते “म्हाडा”च्या पुणे मंडळातील ५२११ घरांची सोडत जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- म्हाडाच्या पुणे मंडळातील ५२११ घरांसाठी आज सोडत काढण्यात आली. या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांचा समावेश आहे.
यात २० टक्के योजनेतील २०८८, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील १७०, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य गटातील २६७५ आणि म्हाडाच्या विविध योजनेतील २७९ घरांचा समावेश आहे.
म्हाडाच्या पुणे (Pune) मंडळातील ५२११ घरांसाठी आज सोडत काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुरदृश्यप्रणालीद्वारे सोडतीचा कार्यक्रम पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार (Mhada Pune Lottery) ५२११ घरांसाठी सुमारे ७१ हजार ७४२ अर्ज आले होते.
पुणे मंडळाकडून अर्जविक्री-स्वीकृती आणि सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून आज सोडत काढण्यात आली. ही सोडत खरंतर २९ जुलैला काढण्यात येणार होती. मात्र राज्य सरकारकडून म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आला. त्यामुळे नवीन उत्पन्न मर्यादेसह अर्ज भरून घ्यावे लागले. संगणकीय प्रणालीत तसे बदल करून पुणे मंडळाने जुलैमध्ये अर्जस्वीकृती सुरू केली. या पार्श्वभूमीवर साहजिकच सोडत पूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देऊन सोडत २९ जुलैऐवजी १८ ऑगस्टला निश्चित करण्यात आली होती.
या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांचा समावेश आहे. यात २० टक्के योजनेतील २०८८, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील १७०, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य गटातील २६७५ आणि म्हाडाच्या विविध योजनेतील २७९ घरांचा समावेश आहे. या सोडतीद्वारे ५२११ अर्जदार विजेते ठरले असून आता पुढे त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करून त्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते सागर खैरनार ठरले आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….