अजित पवारांच्या अडचणी वाढणार ; ईडीने पुन्हा उघडली सिंचनाची फाईल….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
सिंचन घोटाळ्याची फाईल ईडीने पुन्हा उघडली आहे. १९९९ ते २००९ पर्यंत झालेल्या घोटाळ्यातील कागदपत्रे ईडीच्या हवाली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा पुन्हा एकदा लागू शकतो.
काही दिवसापूर्वी या संदर्भात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली होती, पण उच्चा न्यायालयाने या क्लिनचीटवर शिक्कामोर्तब केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात गेल्यानंतर अधिवेशनाच्या तोंडावर या चौकशीची बातमी आली आहे.
हजारो कोटी खर्च करुन केवळ ०.१ टक्के सिंचन क्षमता निर्माण झाली, असे ताशेरे त्यावेळे कॅगने ओढले होते. या सिंचन घोटाळ्याबाबात नागपूर खंडपीठात याचिका प्रलंबित आहे. काही दिवसापूर्वी या संदर्भात एसीबीने अजत पवार यांनी क्लिनचीट दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने या क्लिनचीटवर अद्याप शिक्कामोर्तब केलेला नाही.आता या संदर्भातील चौकशी ईडी पुन्हा सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने १९९९ ते २००९ पर्यंत झालेल्या घोटाळ्यातील कागदपत्रे ईडीच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा पुन्हा एकदा लागू शकतो, असे बोलले जात आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….