निवडून आले आमच्या सोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर , विश्वासघातकी कोण…? ; फडणवीसांचा ठाकरेंना सवाल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- 2019 च्या निवडणुकी नंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यानंतर अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नंतर पुन्हा सत्तांतर झाले असले तरी बंद खोलीत गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली आणि कोणी विश्वासघात केला हे या सर्वांची उत्तरे अर्धवटच राहीलेली आहेत.
असे असले तरी अडीच वर्षाचा फार्म्युला कधी ठरला नसल्याचा पुन्नरउच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी असे काही ठरले होते का अशी विचारणा थेट गृहमंत्री अमित शाह यांना केल्याने हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मात्र, आम्ही बिहारमध्ये करु शकतो तर महाराष्ट्रात का नाही असे म्हणत अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे शहा यांनीही सांगितले होते. हे सर्व असले निवडुण आले आमच्यासोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर, त्यामुळे विश्वासघातकी कोण असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीसांचे उत्तर
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने भाजपाने पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला जातो. शिवाय जे त्यांनी आता केले तेच मी अडीच वर्षापूर्वी सांगितले होते म्हणजे महाविकास आघाडीची उदयच झाला नसता असे ते पटवून देत आहेत, पण असा कोणता फॉर्म्युला ठरलेलाच नव्हता, त्याचा मी साक्षीदार आहे असे म्हणत फडणवीसांनी आरोप फेटाळले आहेत. तर आमच्यासोबत निवडुण आले आणि विरोधकांशी हात मिळवणी करीत सत्तेत बसले मग विश्वासघातकी कोण असा सवालच त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
मी साक्षीदार, फॉर्म्युला ठरलाच नव्हता
अडीच वर्ष शिवसेनेचा आणि त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचे उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत आहेत पण मी या सर्व घटनेचा साक्षीदार राहिलेलो आहे. त्यामुळे असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता. तर आकड्यांचा खेळ करता येतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. सत्ता स्थापनेस मित्र पक्षाची गरज लागतेच हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भूमिका बदलण्यास सुरवात केल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..