हा बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत येणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदाराने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधानभवनातील एक जुना व्हीडिओ ट्विट केला आहे.
त्यामुळे हे आमदार पुन्हा शिवसेनेत जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरेंचा हा जुना व्हीडिओ ट्विट केलाय. या ट्विटमध्ये आमदार शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेखही केला आहे. मंत्रिपद न दिल्याने संजय शिरसाठ नाराज असून हा व्हिडिओ ट्विट केलाय. त्यामुळे आणखी संभ्रम वाढलाय. त्यांच्या ट्विटमुळं शिंदे गटात खळबळ माजलीय.
शिंदे सरकारचा अवघ्या काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. संजय शिरसाठ यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे शिरसाठ दबावतंत्राचा वापर करत असल्याचंही म्हटलं जात आहे.
अन् ट्विट डिलीट
यानंतर आमदार शिरसाठ यांनी हे ट्विट तातडीने डिलीट केलंय. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..