पंतप्रधान मोदींना PMO कर्मचाऱ्यांच्या मुलींनी बांधली राखी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राज्यासह देशभरात आज राखी पोर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आजची राखी पोर्णिमा काहीशी खास अशीच ठरली.
कारण, मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींनी मोदींच्या मनगटावर राखी बांधली.

विशेष बाब म्हणजे मोदींना राखी बांधणाऱ्यांमध्ये ज्या मुलींचा समावेश होता त्या पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर इत्यादींच्या मुली होत्या. त्यामुळे मोदींचा आजचा राखी पोर्णिमेचे सेलिब्रेशन विशेष अर्थाने वेगळे असेच म्हणावे लागेल. याबाबत एनएनआयने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या राखी पोर्णिमेचा प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान पीएमओ कार्यलयात काम करणाऱ्या सफाई कर्मचारी, सहाय्यक, माळी आणि ड्रायव्हर यांच्या मुलींकडून राख्या बांधून घेताना दिसून येत आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांनी आज सकाळी ट्विट करून देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा सण देशभरात सावन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….