आश्चर्यकारक ; शिवसेनेकडून आधी विरोधी पक्ष नेते पदी वर्णी आणि आज भाजपच्या बड्या नेत्यांची भेट ; मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 11 ऑगस्ट :- महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच भरोसा नाही. राज्याच्या राजकारणात गेल्या दीड महिन्यात अनेक घडामोडी घडताना आपण पाहिलं. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे, असं मानलं जात होतं.
पण याच शिवसेनेत गेल्या महिन्यात मोठी फूट पडली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षाला मोठं खिंडार पाडलं. त्यांच्यासोबत सेनेचे 40 आमदार गेले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सेनेला मोठा झटका बसला.
शिवसेनेचे अनेक दिग्गज आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंना पाठिंबा दिला. पण या काळात काही नेते ठाकरेंच्या पाठिमागे खमकेपणाने उभे राहिले. मराठवाड्यातील नेते अंबादास दानवे हे त्यांच्यापैकीच एक. त्यांच्या निष्ठेची दखल घेत उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठी संधी आणि जबाबदारी दिली.
पण ठाकरेंनी दानवेंवर मोठी जबाबदारी दिल्यानंतर आज एक अनपेक्षित घटना बघायला मिळाली. औरंगाबादमध्ये एक वेगळीच आणि अनपेक्षित राजकीय भेट बघायला मिळाली. औरंगाबादमध्ये राजकीय शत्रुत्व बाजूला ठेऊन अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली. औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात ही भेट आश्चर्यकारक आहे.
अंबादास दानवे म्हणाले बागडे नाना माझ्यासाठी कुण्या एका पक्षाचे नाहीत तर औरंगाबादचे जेष्ठ नेते आहेत. यावेळी अंबादास दानवे यांनी सुद्धा अंबादास दानवे यांना पेढा भरवून चांगले काम करण्याचा सल्ला दिला.
राज्यात नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे.
मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता
या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात देखील हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीत राज्य सरकारला पुढच्या काही दिवसांमध्ये कसं घेरायचं याबाबत रणनीती होण्याची शक्यता आहे. याशिवाय विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची निवड केल्याने काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….