“शिवसेना संपवणारा माणूस जन्माला आला नाही आणि येणार ही नाही” ; 40 आमदार 12 खासदार जरी विकत घेतले असतील तरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून राजद , काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करुन सरकार स्थापन केले. यावरुन भाजपने आपण महाराष्ट्रात शिवसेना का फोडली
हे सांगत नितीश कुमार यांना थेट इशारा दिला. सुशीलकुमार मोदी यांनी शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला
होता, म्हणूनच आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले असे म्हटले. मोदींच्या या वक्तव्यावरुन शिवसेना
खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही आणि येणारही नाही, असे विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे.
विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, भाजपच्या त्रासाला कंटाळून नितीश कुमार आता भारतीय जनता पक्ष सोडून गेले. शिवसेनेला परिणाम भोगावे लागणार नाही. सुशील मोदी किंवा आणखी कुणीच शिवसेना संपवू शकणार नाहीत. आमदार (MLA), खासदार (MP) विकत घेतले तरी शिवसेना संपवू शकत नाही, असं राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील शिवसेना, देशातील शिवसेना ही भाजपच्या कपटकारस्थानामुळे पूर्वीपेक्षा आता अधिक गतीने उभी राहते. भले 40 आमदार आणि 12 खासदार विकत घेतले असतील. मात्र शिवसेना तुम्ही संपवू शकत नाही. शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही आणि येणारही नाही, असं म्हणत विनायक राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….