मोठी बातमी ; शिंदे गटातील अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात..? ; कारण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे-फडणवीस सरकारचे १८ आमदार काल मंगळवारी शपथबद्ध झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला. परंतु, राजकीय वर्तुळात कही खुशी तर कही गम’ अशी स्थिती अजूनही कायम आहे.
एकनाथ शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. आमदारांची नाराजी दूर करणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आमदारांना दिलेली आश्वासने न पाळल्याने आमदार नाराज असल्याचेही समजते आहे.
एकनाथ शिंदे गटावर किशोरी पेडणेकरांनी डागली तोफ
शिवेसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी व्यक्त केलीय. शिवसेना आमचीच,धनुष्यबाण आमचंच, बाळासाहेबही आमचेच असं हे आमदार म्हणतात. पण शपथ घेताना किमान आपण बारा तासांचा कालावधी उलटून गेला तरी, एकाही आमदाराला वाटलं नाही की बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जावं. याचा अर्थ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेब वापरायचे, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरायचं, असा घणाघात पेडणेकर यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभार मानते. बहुभाषिक मुंबईत आहेत. मराठी मुंबईत आहेत.मंगलप्रभात लोढा हे विकासक आहेत. ते आमदार आहेत. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, शिवसेनेला आई म्हणणारे मुंबईतून जे गेलेत त्यांच्यातील एकही आमदार मंत्री होऊ शकला नाही, ही मुंबईची शोकांतिका आहे. जे मंत्री महोदय झाले त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला आहे. ते आमच्याकडे आले, त्यांचा आम्ही बहुमान केला, असं म्हणत पेडणेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….