निवडणुका वेळेत घेण्याची मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. न्यायलयाच्या आदेशानंतरही शिंदे-फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
या निवडणुका वेळेत घ्यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रसेचे शिष्टमंडळदेखील दिल्लीत दाखल झाले आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेच्यावतीने आम्ही काल राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल केली आहे. आज आणखी एक याचिका आम्ही दाखल करणार आहे. मागच्या पाच महिन्यांपासून पुणे मनपासहित राज्यातल्या १४ महापालिका, २७ जिल्हापरिषदा, ३५० पंचायत समित्या आणि ३५० नगरपालिकेत प्रशासक नेमण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ओबीसी आरक्षणाच्या निकालावेळी १५ दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन करत या निवडणुका आणखी सात महिले पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्वोच न्यायालयाचा अवमान आहे, त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने नागरिकांना याचा त्रास होतो आहे. अनेकांना पाणी, स्वच्छता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….