राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल ; प्रकृतीत बिघाड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता ज्यानं आपल्या विनोदी स्वभावानं आणि अंदाजानं प्रेक्षकांना वेड लावले अशा राजु श्रीवास्तवच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला आहे.
त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजु हा ट्रेडमिलवर धावत होता त्यावेळी अचानक त्याला आलेल्या चक्करमुळे तो बेशुद्ध पडला. त्याला पुढील उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. केवळ विनोदी कलाकार म्हणून नव्हे तर उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचा अध्यक्ष म्हणूनही राजुची वेगळी ओळख आहे.
गेल्या दीड दशकांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या राजुचा चाहतावर्ग मोठा आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेजमधून राजुला मोठं व्यासपीठ मिळालं. त्यानंतर तो चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या विनोदी अंदाजानं प्रेक्षकांना जिंकुन घेतलं होतं. याशिवाय बॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपट महोत्सव, अॅवॉर्ड शोमध्ये देखील राजुचा सहभाग हा नेहमीच महत्वाचा ठरला आहे. काही वेळा त्यानं त्याच्या अतिउत्साही आणि वाचाळ स्वभावामुळे बॉलीवूड सेलिब्रेटींचा रागही ओढावून घेतला होता.

राजुला रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. राजु हा नेहमीप्रमाणे त्याच्या ट्रेडमिलवर धावत असताना त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध होऊन पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….