विरोधी पक्ष नेतेपदा साठी अजित पवार व जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा ; कोणाची वर्णी लागणार…..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. आता याच विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
अशातच विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रीवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. पाटील म्हणाले, शिवसेने खालोखाल राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. मात्र, सेनेतील ३९ आमदारांनी बंडखोरी करत वेगळा मार्ग स्वीकारला आहे. आता ते विरोधी बाकावर बसले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडील संख्याबळ पाहता आमचाच विरोधी पक्षनेता होईल असं पाटील म्हणाले.
याआधी देखील ‘राष्ट्रवादीकडे आकडे जास्त आहेत त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे असू शकतं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. तसंच विरोधी पक्षनेते पदाबद्दल आमच्या नेत्यांची चर्चा झाली असेल, पण आकडे राष्ट्रवादीकडे जास्त आहेत. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीकडे असू शकतं असंही रोहित म्हणाले होते.
दरम्यान, आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित असून या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा होणार आहे.
तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळतं आहे. त्यामुळे आता विरोधकांकडील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्ष नेते पदावर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….