जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे बाल विवाह जनजागृतीपर रॅलीचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 10 मे :- जिल्हयात बालविवाह होऊ नये व समाजात जनजागृती व्हावी म्हणून महिला व बाल विकास विभागाद्वारे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येवून याअंतर्गत 2 मे रोजी बालविवाह जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीद्वारे नगरपरिषद शाळा क्र. 6, डोर्लीपुरा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात बालविवाह पर जनजागृती गीत, पथनाट्य व उद्बोधनपर घोषवाक्ये यांच्या माध्यमातून परिसरात जनजागृती करण्यात आली. १८ वर्षाखालील मुलगी व २१ वर्षाखालील मुलगा यांचा विवाह करणे अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे असा संदेश यावेळी देण्यात आला. रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात अॅड. प्राची निलावार, अध्यक्ष बाल कल्याण समिती व श्री गजानन जुमळे, अधीक्षक शासकीय मुलांचे बालगृह यांनी उपस्थितांशी संवाद साधला व बाल विवाह होण्याची कारणे दुष्परिणाम बाबत त्यांनी सखोल माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्याद्वारे “आम्ही बाल विवाह करणार नाही व बाल विवाह होत असेल तर त्याबाबत तात्काळ माहिती प्रशासनास व चाईल्ड हेल्पलाइन वर देऊ” याबाबत शपथ वाचन करण्यात आली.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, यवतमाळ, आशादिप सामाजिक संस्था व नगर परिषद शाळा क्र. ६ यांच्या द्वारे अक्षयतृतीया व त्यानंतरच्या शुभ मुहूर्तावर होणारे बालविवाह होऊ नये व समाजात जनजागृती व्हावी म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅलीचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी केले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षचे देवेंद्र राजूरकर, अविनाश पिसुर्डे, स्वप्नील शेटे, सुनील बोक्से, चाईल्ड लाईनचे गायत्री उर्कुटकर, दिलीप दाभाडेकर, आशादिप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आत्राम, न. प. शाळा क्र. 6 च्या मुख्याध्यापक करूणा खैरे, शिक्षक वर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…