आदिवासी आश्रम शाळेत शिकवणी वर्ग घेण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित ; नोंदणीकृत शिकवणी संस्थांनी 17 मे पर्यंत अर्ज करावे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 10 मे :- जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2021-22, नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद यांचे कार्यक्षेत्रातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता शिकवणी वर्ग योजना राबविण्यात येत असून शिकवणी वर्ग घेण्यासाठी 17 मे 2022 पर्यंत प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत शासकीय आश्रम शाळा वसंतपुर व शासकीय आश्रम शाळा हर्षी येथील इयत्ता 12 वी मध्ये प्रवेशित शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकरीता वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाकरीता प्रवेशपुर्व शिकवणी वर्ग आयोजित करणे तसेच शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा वडगांव शिंदे व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा पुसद येथील इयत्ता 10 वी मध्ये प्रवेशित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकरीता खाजगी शिकवणी वर्ग आयोजित करावयाचे आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकवणी वर्ग घ्यावयाचे आहेत.
तरी नोंदणीकृत, इच्छुक व पात्र कोचिंग क्लासेस / इन्स्टिटयुट / शिकवणी वर्ग यांनी परिपुर्ण माहितीसह भरलेले प्रस्ताव दिनांक 17 मे 2022 पर्यत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. यानंतर येणारे कोणतेही प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…