शेततळे योजनेकरीता 20 मे पर्यंत अर्ज आमंत्रित…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 10 मे :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद कार्यालयांतर्गत विशेष केंद्रीय सहाय योजना अंतर्गत शेततळ्याच्या योजनेकरीता दारिद्र्यरेषेखालील अनुसूचीत जमातीच्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेत अनुसूचीत जमातीच्या शेतक-यांच्या शेतात शेततळयाचे खोदकाम प्लास्टीक अस्तरीकरणासह करणे आणि यासह ठिबक सिंचन संच व भाजीपाला व फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
अर्जासोबत दारीद्रयरेषेचे प्रमाणपत्र, 7/12 उतारा, 8 अ, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, यापुर्वी योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामसभेचे शिफारस पत्र, पासपोर्ट फोटो, आदिम जमाती/विधवा/परितक्त्या/अपंगाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
वरील योजनेचे अर्ज शासकीय आश्रमशाळा, अनुदानीत आश्रमशाळा तसेच शासकीय वसतीगृह येथील सेतु सुविधा केंद्रात तसेच प्रकल्प कार्यालय, पुसद जि. यवतमाळ येथे उपलब्ध राहतील. वरील योजनेचे सर्व कागदपत्रांसह परिपुर्ण भरलेले अर्ज सदर सेतु सुविधा केंद्रात किंवा प्रकल्प कार्यालय, पुसद जि. यवतमाळ येथे 20 मे 2022 पर्यंत सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…