सेवा समाप्त केलेले होमगार्ड यांना संघटनेत सामावून घेणार ; पुन:नोंदणीत अपात्र ठरलेल्या होमगार्ड यांनी 31 मे पर्यंत अर्ज करावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 10 मे :- होमगार्ड मुख्यालयाच्या आदेशानुसार ज्या होमगार्डची दि. 17 जुलै 2015 ते 31 मार्च 2022 या कालावधीत पुन:नोंदणीत अपात्र झाल्याचे कारणाने सेवा समाप्त करण्यात आलेली आहे, त्या होमगार्डना संघटनेत परत सामावून घेण्यात येणार आहे.
वरील कालावधीत फक्त पुन:नोंदणीत अपात्र झालेल्या होमगार्ड यांनी भविष्यात कोणत्याही संघटनेचे सदस्य होणार नाही, कोणत्याही आंदोलनात भाग घेणार नाही किंवा बेशिस्त वर्तन करणार नाही याबाबत हमीपत्र द्यावे. शारिरीक दृष्ट्या पात्र असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र व पोलिस चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यावर उपलब्ध अनुशेषानुसार सेवा ज्येष्ठतेच्या आधारे संघटनेत सामावून घेण्याचे कार्यवाही केली जाईल.
तरी संबंधीत माजी होमगार्डने त्याची परत होमगार्ड संघटनेत कार्य करण्याची इच्छा असल्यास त्यानी 31 मे 2022 पर्यंत होमगार्ड प्रशिक्ष्ण केंद्र, यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत आपला अर्ज सादर करावा. अधिक माहिती होमगार्ड जिल्हा समादेशक अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…