ईडीने थेट नवाब मालिकांचं सलाईन काढून जबरदस्तीने करवून घेतलं डिस्चार्ज..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत.
मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई केली असून, ते मागच्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात अडकलेले आहेत. मात्र अशातच त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना आता पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच नवाब मलिकांच्या वकिलांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई सत्र न्यायालयात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
नवाब मलिक हे जे. जे. रुग्णालयात भरती असताना योग्य तशी वागणूक दिली गेली नाही. त्यांना अक्षरश: पिण्याच्या पाण्याची बॉटल देखील देण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडून मलिक यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज करून घेतला असल्याचा धक्कादायक आरोपही यावेळी करण्यात आली आहे.
रुग्णालयात सलाईन सुरू असताना कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे सलाईन काढली आणि डिस्चार्ज पेपरवर सही घेतली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मलिक यांना ईडीतर्फे अद्यापपर्यंत आरोप पत्राची प्रत देखील देण्यात आली नसल्याची माहिती कोर्टाच्या निदर्शनात आणण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने वरील आरोपांसंदर्भात योग्य ते निर्देश ईडीला देण्याची विनंती आज कोर्टासमोर करण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिक यांचे वकिल निलेश भोसले यांनी दिली आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….