अमित शाहंचे सौरभ गांगुलीच्या घरी “डिनर पॉलिटिक्स”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली राजकारणात येणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा (Amit Shah) यांनी सौरभ गांगुलीच्या कोलकात्यातील घरी भेट घेऊन या चर्चांना अजूनच हवा दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सौरभ गांगुली आपली राजकीय इनिंग सुरु करणार अशा बातम्या येत होत्या. त्यावेळी अमित शहा गांगुलीला भेटणार असल्याची चर्चा देखील होती. अखेर आज अमित शहा यांनी सौरभ गांगुलीची त्याच्या कोलकात्यातील घरी भेट घेतली. यावेळी सौरभ गांगुलीचे सर्व कुटुंबीय आणि भाऊ देखील उपस्थित होता. अमित शहा यांनी रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. सौरभ गांगुली हा सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. तसेच अमित शहा यांचा चिरंजीव जय शहा बीसीसीआयचे सचिव आहेत.
सौरभ गांगुली आणि जय शहा यांचा बीसीसीआय पदाधिकारी म्हणून कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे गांगुली आता राजकारणात उतरणार अशी शक्यता वर्तवली जात होती. सौरभ गांगुलीचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत देखील चांगले संबंध आहे. दरम्यान, सौरभ गांगुलीने अमित शहांबरोबरच्या डिनर पॉलिटिक्सबद्दल बोलताना सांगितले की, ‘ते आज संध्याकाळी घरी येणार आहेत. त्यांनी माझे आमंत्रण स्विकारले आहे. आमच्याकडे बोलायला अनेक विषय आहेत. मी त्यांना 2008 पासून ओळखतो. ज्यावेळी मी खेळत होतो त्यावेळी मी त्यांच्याशी भेटायचो. मी त्यांच्या मुलासोबतही काम करत आहे. हे एक जुने नाते आहे.’

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….