प्रतापगढ़ किल्ल्याला भेंट देवून राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे अभिवाद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सातारा :- शिवकालीन खेडेगावाला भेट देवून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे स्थळ प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वीर सैनिकांना माझे विनम्र अभिवादन आहे, अशा भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या महाबळेश्वरला मुक्कामी असून त्यांनी प्रतापगड किल्ल्याला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला. यावेळी त्यांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन मनोभावी पुजा केली. यानंतर त्यांनी किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.यावेळी किल्ले प्रतापगड येथील ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले. प्रतापगड माची येथील शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास त्यांनी भेट दिली. शिवकालीन खेडेगावाला भेट देवून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे स्थळ प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वीर सैनिकांना माझे अभिवादन आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर येथील सनसेट पॉईंटला भेट दिली. यावेळी त्यांनी पर्यटनासाठी आलेल्या लहान मुलांशी संवादही साधला. दरम्यान, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेल एअर रेड क्रॉस संचलित महाबळेश्वर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी फादर टॉमी, चेअरमन जयसिंग मरिवाला, सुपरिटेंडेंट डॉ. पंडीतराव देशमुख आदी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत चौकशी केली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…