एकजुटीने उपाययोजना केल्यास आजारांवर प्रतिबंध शक्य :- जिल्हाधिकारी अमोल येडगे ; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे वाटप ; जागतिक हिवताप दिन निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 25 एप्रिल, :- गेल्या दोन वर्षापासून ज्याप्रमाणे कोविड विरूद्ध लढा देतांना एकत्रितपणे नियमांचे पालन व लसिकरणामुळे आपण कोरोना आजारावर नियंत्रण मिळविले त्याचप्रमाणे बालकांमधील जंताचा नाश करण्यासाठी 19 वर्षाखालील सर्वांनी जंतनाशक मोहिमेत जंतनाशकाची गोळी घ्यावी. एकजुटीने उपाययोजना केल्यास मुलांमधील जंताच्या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज व्यक्त केले
राष्ट्रीय जंतनाशक दिन व जागतिक हिवताप दिन निमित्त शिवाजी हायस्कुल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्या देवून राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच जागतिक हिवताप दिननिमित्त हिवताप कार्यालया पासून शिवाजी हायस्कूल, स्टेट बँक चौक पर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आरोग्य विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचेसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, आरोग्य सेवा उपसंचालक कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय आकोलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढे सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेच्या दाखल्यानुसार 19 वर्षाखालील 68 टक्के विद्यार्थ्यांमध्ये जंताचा त्रास असतो. जंतामुळे रक्ताक्षय होउन रोगप्रतिकार क्षमता व बौद्धिक आकलन क्षमता कमी होणे तसेच इतर आजार होऊन बालकांचा शारिरिक व मानसिक विकास खुटंतो. यासाठी सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शाळाबाह्य मुलांना जंतनाशकाची गोळी देण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. जंताच्या गोळीचे महत्व जाणून सर्वांनी जंताच्या गोळीच्या सेवन करावे, असे आवाहन त्यांनी केले. जंत व हिवताप आजारावर प्रतिबंध हाच पर्याय असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी कोविड लसिकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले व आपल्या पालकांचे लसिकरण पुर्ण करून घेण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हिवताप तसेच ड्येंग्यु, मलेरिया व इतर आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्या घरात व परिसरात नियमित स्वच्छता बाळगण्याचे तसेच डासांची अंडी नष्ट करण्याचे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषणातून जंतनाशक दिन व जागतिक हिवताप दिन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपले हात नियमित स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाटील यांनी केले.
याप्रसंगी माताबाल संगोपान अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, डॉ. तनवीर शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, डॉ. मनोज तगडपल्लेवार, मुख्याध्यापक श्री. मडावी, श्री. देवतळे, डॉ. प्रीती दुधे, डॉ. नाजीया काझी, आरोग्य कर्मचारी धीरज पीसे, धनंजय मेश्राम, अनिल परचाके, दिलीप मेश्राम, शाईना शेख, सुवर्णा नाईक, शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…