हनुमान चालीसा वाद ; नवनीत आणि रवी राणा यांना दिलासा नाहीच ; आता २९ एप्रिल ला याचिकेवर सुनावणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- हनुमान चालीसा वाद प्रकरणी अटकेत असलेले राणा दाम्पत्याला मुंबईतील सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या दोघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती, पण न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.
आता या प्रकरणावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या वादानंतर राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्यावर आयपीसीच्या कलम 15ए आणि 353 तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्वात मोठे कलम 124A म्हणजेच देशद्रोहाचे कलमही लागू करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती ही याचिका
यापूर्वी नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची याचिका फेटाळून लावली होती. सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा पठण केल्याबद्दल नवनीत राणा यांना फटकारले होते. सार्वजनिक जीवनात ज्यांची जबाबदारी असते, त्यांच्यावर अधिक जबाबदारी असते, असे न्यायालयाने म्हटले होते.

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….