जिल्ह्याला आव्हान निधी मिळण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न कारावे :- जिल्हाधिकारी ; जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा ; सन 2021 – 22 मध्ये खर्चाचा ताळमेळ जुळविण्यात जिल्हा राज्यात प्रथम ; 2021 – 22 मधील 99. 93 टक्के निधी खर्च…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 25 एप्रिल :- जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आणि जिल्हा वार्षिक आदिवासी योजना या तीनही योजनेत सन 2021 -22 मध्ये दिलेला निधी कोणकोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला, त्या कामांच्या यादिसह झालेल्या खर्चाची नोंद आयपास प्रणालीवर करून जिल्ह्याला 50 कोटी रुपयांचा आव्हान निधी मिळण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कार्यकारी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके उपस्थित होते.
सर्व विभागांच्या सन 2021- 22 मध्ये झालेल्या सर्व कामाचे फोटो आयपास प्रणालीवर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा खर्च 99 टक्के झाला आहे. तसेच प्रत्येक विभागाकडून झालेल्या खर्चाचा महालेखाकार यांच्याकडून ताळमेळ जुळवून घ्यावा लागतो. याबाबतीत राज्यात यवतमाळ जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
सन 2021-22 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी जिल्ह्याला 325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात 324 कोटी 97 लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आला. यापैकी 324 कोटी 77 लक्ष रुपये म्हणजे 99.93 टक्के खर्च झालेला आहे. सर्व यंत्रणांनी चांगले काम केल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
सन 2022-23 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 356 कोटी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे. प्राप्त तरतुदीनुसार प्रत्येक विभागाने सर्व प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह 15 मे पर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात.
या बैठकीला सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…