राणा दाम्पत्य मुंबईत दाखल ; मातोश्री समोर हनुमान चालीसा पठाण करण्याचा निर्धार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर (Matoshri) जाण्यासाठी मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत.त्यांनी कोणतीही सुरक्षा न घेता विमानाने मुंबईत प्रवेश केला आहे. हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राणांसोबत 500 हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत. यामुळे मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवसैनिक राणा दाम्पत्याचा विरोध करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवर पाहोचार का हे काही वेळातच स्पष्ट होईल.
राणा दाम्पत्य आज (शुक्रवारी) संध्याकाळी अमरावतीहून मुंबईसाठी निघणार होते. शिवसेनेने याला विरोध दर्शवित त्यांना रोखण्यासाठी रणनीती आखली होती. पोलिसही राणा दाम्पत्याला स्थानबद्ध करण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिक आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणावी नाही तर आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणू असा इशारा आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांनी दिला होता. यासाठी त्यांनी रेल्वेचे तिकीटही काढले होत. येत्या २२ एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर (Matoshri) जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार असून त्यासाठी मुंबईला जायचं तिकीट देखील बुक केल्याची माहीती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिली होती.

हनुमान जयंतीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार असल्याचं वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं होतं. राणा यांच्या आव्हानानंतर शिवसेनेने (Shivsena) देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. याबाबत धार्मिक तेढ पसरवून दंगल माजवायची आहे का? असा प्रश्न मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा यांना विचारला होता. तर राणा दाम्पत्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी निदर्शने देखील केली होती. मात्र तरीही राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानं राजकारण तापलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….