राहुल खारकर यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या विदर्भ प्रदेश सचिव पदी नियुक्ती….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक दिनांक 19 एप्रिल रोज शनिवार ला नागपूर येथील मुख्यालयात पार पडली.या बैठकीत युवा आघाडी विदर्भ प्रमुख मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात विदर्भवादी नेते वामनराव यांच्या मार्गदर्शनात तर देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा किसान ब्रिगेड चे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या हस्ते राहुल खारकर यांची विदर्भ प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. विदर्भ आंदोलनात राहुल खारकर यांचा प्रवास 2014 पासून सुरू झाला सर्व प्रथम ते विदर्भवादी म्हणून विविध आंदोलनात होते नंतर ते काही वर्षे वणी तालुका अध्यक्ष तर यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी ते सलग 4 वर्ष होते.आता त्यांची युवा आघाडी विदर्भ प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.त्यांनी विदर्भाचे राज्य झाल्याखेरीज आंदोलन थांबणार नाही असा या बैठकीत निर्धार व्यक्त केला.यावेळी या बैठकीला उपस्थित वामनराव चटप,प्रकाश पोहरे,अविनाश काकडे,अरुण केदार,प्रभाकर कोंबतुवार, प्रा.पुरुषोत्तम पाटील,मुकेश मासुरकर,सुनील वडसकर यांच्यासह या बैठकीला विदर्भवादी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..