ठाकरे सरकारकडून १२ तासांच्या आत पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बढतीला स्थगिती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. मात्र १२ तासांच्या आतच यामधील पाच अधिकाऱ्यांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे चर्चांना उधाण आलं असून नेमकं असं काय घडलं की निर्णय मागे घ्यावा लागला असा प्रश्न विचारला जात आहे.
ते अधिकारी कोण आहेत?
राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे यांच्या बढतीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पत्रामध्ये गृहमंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे
राजेंद्र माने राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होते आणि त्यांना ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात अपर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती. तर महेश पाटील यांना पोलीस उपायुक्त पदावरुन मुंबईतील वाहतूक विभागात अपर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती.
संजय जाधव पुण्यातील महामार्ग सुरक्षा पथकात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची ठाणे शहरात अप्पर पोलीस आयुक्तपदी (प्रशासन) बढती कऱण्यात आली होती. पंजाबराव उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पोलीस मुंबईत अपर पोलीस आयुक्तपदी (सशस्त्र पोलीस) बढती देण्यात आली होती. तर दत्तात्रय शिंदे यांनी पालघरमधील पोलीस अधीक्षक पदावरुन मुंबईत अपर पोलीस आयुक्तपदी (संरक्षण व सुरक्षा) बढती देण्यात आली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..