राज्यात पुन्हा निर्बंध लागणार…? ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्क सक्ती हटवण्यात आली होती. मात्र, मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्क सक्ती परतण्याची दाट शक्यता आहे.
दिल्लीतील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या दोन हजारांच्या जवळ पोहोचली आहे. त्यात मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या देखील वाढत असल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.
अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र पाठवत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात पुन्हा निर्बंध लावणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
देशात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि सोबतच मास्कची देखील सक्ती राहावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र पाठवत महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना दिल्या आहेत.
पाश्चिमात्य देशात कोरोना रूग्णसंख्या वाठली आहे तर दिल्लीत देखील रुग्णसंख्या वाठली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि आयसीएमआर सर्व गोष्टींवर नजर ठेऊन आहेत. योग्य वेळी निर्णय घेऊ, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने आता सक्ती नसली तरी सर्वांनी मास्क घालावा, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..