मुंबई मध्ये होणारी मोठी हाणी टळली ; दोन रेल्वे आमने-सामने ; हजारों प्रवाशांचा जीव वाचला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माटुंग्याजवळ दोन रेल्वे आमने सामने आल्याची घटना घडली आहे.
दादरच्या (Dadar) प्लॅट फॉर्म क्रमांक सातवर ही घटना घडली आहे. दोन रेल्वेची क्रॉसींग होत असताना हा अपघात घडला आहे. यावेळी ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने काही आवाज देखील झाल्याचं प्रवाशांकडून सांगण्यात येतंय. दोन एक्सप्रेस आमने सामने आल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. गदग एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस एमेकांवर आदळता आदळता थोडक्यात बचावल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचा जीव वाचला. ११००५ या रेल्वेची गदग एक्सप्रेसला धडक दिल्याने काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वेचे माहिती व संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
रेल्वे रुळावर दोन रेल्वे आमने सामने आल्यानंतर काही वेळासाठी वाहतुक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक यामुळे खोळंबली आहे. या घटनेत रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची देखील माहिती समोर आली आहे. हा अपघात झाला त्यावेळी शॉर्टसर्कीट देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, अग्निशामक दल, पोलीस यांच्यासह सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.त्यानंतर आता बचाव कार्य सुरु झालं असून, वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु झालं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..