“या” राज्यात निवडणुकीच्या पूर्वी “आप” ला मोठा झटका ; प्रदेशाध्यक्ष , संघटन महामंत्र्यांसह अनेक नेत्यांचे भाजपात प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे.
आपचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष आणि संघटन मंत्री यांनी भाजपत (BJP) प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत आपचे प्रदेशाध्यक्ष अनूप केसरी, संघटनेचे सरचिटणीस सतीश ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत दिली माहिती –
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ट्विट करत म्हणाले, “अरविंद केजरीवाल, पहाड आणि पहाडी आपल्या जाळ्यात अडकणार नाहीत. आम आदमी पक्षाच्या हिमाचल विरोधी धोरणां विरोधात, AAP चे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनुप केसरी, संघटनेचे सरचिटणीस सतीश ठाकूर आणि उना अध्यक्ष इक्बाल सिंग यांनी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुख्य उपस्थितीत जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपत प्रवेश केला आहे. आपल्या सर्वांचे भाजप परिवारात स्वागत, अभिनंदन.”
हिमाचलमध्येही होणार यूपीसारख्या विजयाची पुनरावृत्ती –
ठाकूर यांनी पुढे लिहिले, उत्तर प्रदेशात आपली सर्वच जागांवर जमानत जप्त झाली. हिमाचलही याची पुनरावृत्ती करण्यास तयार आहे. विरोधकही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत, कारण त्यांचा विश्वास, “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या ब्रीदवाक्यावर आहे.
भाजपाध्यक्ष हिमाचल दौऱ्यावर –
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सध्या हिमाचल प्रदेशच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते अनेक संघटनात्मक आणि सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत. पाच राज्यांतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जबरदस्त कामगिरीनंतर नड्डा यांचा हा पहिलाच राज्य दौरा आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांनी शुक्रवारी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….