काल “जल्लोष” करणारे एसटी कर्मचारी आज “आक्रामक” का झाले….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेले पाच महिने आझाद मैदानात आंदोलनाला बसलेले ‘राज्य परिवहन मंडळा’चे (ST) कर्मचारी शुक्रवारी आक्रमक झाले. दुपारी ३ वाजता कर्मचाऱ्यांच्या संतप्त जमावाने घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर धुडगूस घातला.
यावेळी त्यांनी पवार यांच्या घराच्या दिशेने चपला फेकून मारल्या. एकाएकी आलेल्या जमावाला थोपवताना पोलीस प्रशासनाचीही तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाला संभाव्य आंदोलनाची कल्पना का आली नाही आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर जल्लोष करणारे आंदोलक अचानक आक्रमक का बनले, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे हजर झाल्या होत्या. शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले; मात्र तरीही आंदोलकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे चर्चा न करता आपले आई-वडील व मुलीची सुरक्षितता पाहण्यासाठी त्या घरात गेल्या.
आंदोलकांना अडवण्यासाठी पवार यांच्या घराबाहेर फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. आंदोलनाची तीव्रता एवढी होती की अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील स्वत: आंदोलकांना आवरण्यासाठी हजर होते. साधारण तासभर आंदोलन झाल्यानंतर सर्व आंदोलकांना वाहनांमध्ये बसवून पुन्हा आझाद मैदानात नेण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गुरूवारी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जल्लोष केला होता. मग त्यानंतरही हे आंदोलन का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंदोलकांना कोणीतरी हेतूपुरस्सर चिथवल्याची शंका उपस्थित होत आहे.
न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत; मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे.
गृह विभागावर प्रश्नचिन्ह
आझाद मैदानातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी त्यांची गुप्त यंत्रणा तैनात केली आहे; मात्र, गुरुवारी न्यायालयाच्या निर्णयानंतरही आंदोलक शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ बंगल्यावर धडकणार यासंदर्भात पोलिसांच्या गुप्त यंत्रणेला माहिती मिळाली नव्हती का, एसटी कर्मचारी एवढ्या मोठ्या संख्येने पवार यांच्या बंगल्यावर पोहोचले कसे, पोलिसांची गुप्त यंत्रणा गाफील कशी राहिली, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….