आमदारांच्या नाराजीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घेणार शरद पवारांची भेट ; महत्वाच्या मुद्द्यावर होणार चर्चा……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे. नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा शुक्रवारी भेट घेणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस आमदारांनी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे व्यक्त केलेल्या नाराजीनंतर नाना पटोले पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीमधील नाराजी आणि महामंडळ वाटप याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत चर्चा होऊ शकते.
महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे आमदारांमध्ये नाराजी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. निधी वाटपावरुन, आमदारांची कामे होत नसल्यामुळे आणि पदाधिकाऱ्यांच्या कामात अडथळे येत असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेस आमदारांनी काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधातच पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता भेट होणार आहे. या भेटीमध्ये महाविकास आघाडी सराकमधील समन्वय आणि महामंडळ वाटप, शासकीय नियुक्त्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याची चर्चा सुरु असून या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून त्यांच्यासोबतही या विषयांवर चर्चा होऊ शकते.
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
दिल्लीत संसदेच्या कामकाजानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २० मिनिटांची भेट झाली. या भेटीमध्ये शरद पवार यांनी राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबतच्या कारवाईची पंतप्रधान मोदींना माहिती दिली असल्याचे शरद पवार स्वतः म्हणाले. ही कारवाई योग्य नसल्याचे पंतप्रधान यांच्या कानावर टाकले असल्याचे पवार म्हणाले आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….