“आमचे आमदार फुटणार नाहीत , कोणी फुटलाच तर….”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं म्हटलं होतं.
त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील आमदारांना इशारा दिला आहे.
आमचा एकही आमदार फुटणार नाही. जर कोणी फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. जनताच त्यांना सळो की पळो करून सोडेल. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन आमदाराविरोधात लढू, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या दाव्यावर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना इशारा दिला आहे. जयंत पाटील यांनी बोलताना राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील भाष्य केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भाजपच्या आमदारांनाही मोठा निधी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात एवढा निधी मिळाला नाही, असं भाजपचे आमदार सांगत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना एमआयएमच्या ऑफरवर देखील भाष्य केलं आहे. एमआयएम हा समविचारी पक्ष आहे का?, याचा विचार करावा लागेल. एमआयएम पक्षाने भाजपला असलेला विरोध आपल्या कृतीतून दाखवायला हवा, असं आव्हान जयंत पाटलांनी दिलं आहे. उत्तर प्रदेशात एमआयएममुळे सपाचा पराभव झाला. एमआयएमने अनेक मतं घेतली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….