इम्तियाज जलील यांच्या भेटी बाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे भाष्य…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात झालेल्या भेटीनंतर एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू झाली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इम्तियाज जलील यांच्या भेटीबाबत भाष्य केले आहे.
राजेश टोपे यांनी म्हटले, इम्तियाज यांच्यासोबत झालेली भेट अनौपचारिक होती. जलील यांची घेतलेली भेट ही सात्वंनपर होती. इम्तियाज यांच्या मातोश्रीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. या भेटी दरम्यान, काही मुद्यांवर अनौपचारिक चर्चा झाली. यामध्ये उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत एमआयएममुळे काही 10-15 जागा पडल्या. भाजपविरोधी आघाडीच्या तेवढ्या जागा वाढल्या असत्या, याकडे लक्ष वेधले.
इम्तियाज जलील यांनी त्यावर भूमिका मांडताना सांगितले की, अल्पसंख्याक समुदायाचा विकास करणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी आमचे काम सुरू असते. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारकडून अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल्याचे टोपे यांनी जलील यांना म्हटले. एमआयएमसोबतच्या युतीच्या प्रस्तावावर पक्षातील नेते निर्णय घेतील, असेही टोपे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत विकासाच्या मुद्यांबाबत चर्चा करा अशी सूचना केल्याचे टोपे यांनी म्हटले. ही चर्चा सहजपणे झाली होती. या भेटीत एमआयएमची भूमिका ही कट्टरतावादी आहे. कट्टरतावादी भूमिका सोडावी, असेही जलील यांना सांगितल्याचे टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….