जिल्हाधिकाऱ्यांनी केली दारव्हा तालुक्यातील विविध कामांची पाहणी ; नागरिकांशी संवाद व तलाठी दप्तराची तपासणी ; चिमुकल्या विद्यार्थ्यांशी गुजगोष्टी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 मार्च, :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल दारव्हा तालुक्यात भेट देवून तेथील सिंचन विहिरी, रेशीम शेती, तुती लागवड प्रकल्प, शेळी पालन, कुक्कुटपालन प्रकल्प, रोजगार हमी योजनेची कामे, शासकीय इमारतीचे बांधकाम, वन विभागचे उद्यान तसेच जलशुद्धीकरण केंद्रावरील कामांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधून समस्यांची माहिती घेतली. जिल्हाधिकारी यांनी बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट देवून तेथील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी त्यांनी तलाठी दप्ताराची पाहणी केली व महसुली कोर्ट केसेस तातडीने निकाली काढण्याच्या सांगितले. तसेच तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखाची सभा घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला व कामाला गती देण्याचा सूचना दिल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांचेसमवेते उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार सुभाष जाधव, ग्रामसेवक श्री. गावंडे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व इतर संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..