उन्हाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 मार्च, :- प्रादेशिक मौसम विभाग मुबंई यांचे हवामान अंदाज दिनांक 14 मार्च 2022 नुसार राज्याच्या वातावरणात बदल झाला असून काही भागात वातावरण उष्ण राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. करीता उन्हाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून “काय करावे–काय करू नये” याबाबत मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी निर्गमित केल्या आहेत.
काय करावे – तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेशे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना काळजी घेण्याबाबत सुचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये -मध्ये ब्रेक घेउन नियमित आराम करण्यात यावा. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
काय करू नये : लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे व बाहेर काम करणे टाळावे. गडद व घट्ट जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावित, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..