‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ; हिवरी येथील समाधान शिबीरात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन ; जातीचे दाखले, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, निराधार प्रमाणपत्राचे वितरण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 मार्च, :- शासकीय योजनांपासून कोणीही वंचित राहू नये व सर्वांचा विकास व्हावा या हेतूने ‘शासन आपल्या दारी’ यासारखे उपक्रम प्रशासनामार्फत राबविण्यात येत असून याद्वारे आपल्या जवळ पोहचून आपल्या समस्या सोडविण्यास प्राधाण्य देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
यवतमाळ तालुक्यातील मौजा हिवरी येथे महसुल विभागाने आयोजित केलेल्या महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. शिबीरात जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबीरात ग्रामस्थांना जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, कुटूंब अर्थसहाय्य योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्डचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी आरोग्य तपासणी कॅम्प, कृषी विभाग स्टॉल, आधार कार्ड अद्यावतीकरण, बचत गट, रिलायन्स फाऊंडेशन व पुरवठा विभागाचा स्टॉल लावण्यात आला होता.
याप्रसंगी हिवरी-वाटखेड या लोकसहभागातून तयार करावयाच्या पांदण रस्त्याचे भूमिपूजन जिल्हाधीकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी जगदीश जयस्वाल, नितीन खरोडे, तलाठी रवी डवले, धिरज पत्रे, सुजाता मनवर, माधवी नवरखेले, योगेश आडे, प्रशांत गुल्हाणे, शरद गावंडे, गणेश तेलेवार, भावना लोखंडे, रूपाली जाधव, अतुल खोब्रागडे, तुळशीदास मोरकर, शंकर आडे तसेच हिवरी ग्रमापंचायतीचे सरपंच व सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला हिवरी व आसपासच्या गावातील नागरिक उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..