नवाब मलिक यांचे पुत्र फ़राज मलिक यांना ईडी कडून दुसरे समन्स…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांना ईडीने मंगळवारी दुसरे समन्स पाठवले असून, चौकशीकरिता बोलावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांना ईडीने मंगळवारी दुसरे समन्स पाठवले असून, चौकशीकरिता बोलावले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकार्यांमार्फत झालेल्या हवाला प्रकरणात ईडीकडून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
फराज मलिक यांना ईडीने यापूर्वी देखील समन्स पाठवले होते, मात्र ते ईडी कार्यालयात चौकशीला समोर आले नव्हते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत कार्यालयात काही वेळ देण्यात यावा याकरिता ईडीला अर्ज दिला होता. मात्र, ईडीने तेव्हा अर्ज मंजूर केला नव्हता. त्यानंतर पुन्हा 15 मार्च रोजी ईडीने फराज मलिक यांना समन्स पाठवले असून चौकशीला बोलवले आहे. विशेष म्हणजे, कालच नवाब मलिक यांचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ईडीने नवाब मलिक यांच्या मुलाला समन्स पाठवल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..