‘गांधी कुटुंबानं स्वेच्छेनं नेतृत्वापासून दूर रहावं आणि दुसऱ्याला संधी द्यावी.’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी गांधी कुटुंबाला (Gandhi Family) पक्षाच्या नेतृत्वापासून दूर राहण्यास सांगितलंय.
गांधी घराण्यानं काँग्रेसच्या नेतृत्वापासून दूर जावं आणि नेतृत्वाच्या भूमिकेसाठी दुसऱ्याला संधी द्यावी, असं ते म्हणाले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्यानंतर आणि काँग्रेस कार्यकारिणीनं सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर सिब्बल यांचं वक्तव्य समोर आलंय.
कपिल सिब्बल यांनी विचारमंथन सत्र आयोजित करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर टीका केलीय. आठ वर्षांनंतरही पक्षाच्या पडझडीची कारणं कळत नसतील, तर नेतृत्व ‘कुकू लँड’मध्ये राहत असल्याचंही ते म्हणाले. G23 नेत्यांनी 2020 मध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडं पक्षात मोठे बदल करण्याची मागणी केली होती. गांधी घराण्यानं नवीन नेत्यासाठी मार्ग काढावा, अशी मागणी करणारे सिब्बल हे काँग्रेसचे पहिले ज्येष्ठ नेते आहेत.
ते पुढे म्हणाले, गांधी कुटुंबानं स्वेच्छेनं नेतृत्वापासून दूर रहावं आणि दुसऱ्याला संधी द्यावी. तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळं किंवा सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्याच्या CWC च्या निर्णयामुळं मला आश्चर्य वाटलं नाही. आमच्यासारखं अनेक नेते सीडब्ल्यूसीमध्ये नाहीत, परंतु काँग्रेसचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..