हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी ; शहरात कलम 144 लागू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बंगळुरू 15 मार्च :- कर्नाटक हायकोर्ट (Karnataka High Court) हिजाब प्रकरणी (Karnataka Hijab Row) आज म्हणजेच १५ मार्च रोजी निकाल देणार आहे.
कर्नाटकसह देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने विशेष खंडपीठाची स्थापना केली होती. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या या खंडपीठाने वर्गात हिजाब घालण्याच्या अधिकाराशी संबंधित सर्व याचिकांवर २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता आणि आज कर्नाटक उच्च न्यायालय या महत्त्वपूर्ण प्रकरणावर आपला निर्णय देणार आहे. या प्रकरणावरून राज्यात हिंसाचार आणि गदारोळ माजला होता. त्यामुळे या निर्णयाच्या एक दिवस आधी सोमवारी बंगळुरू शहरात कलम 144 लागू करण्यात आलं असून आठवडाभर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
The Kashmir Files मुळे देशभरात का तापलं राजकीय वातावरण? या निर्णयापूर्वी, बंगळुरूमध्ये 21 मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या सभा, आंदोलनं, निषेध किंवा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. या प्रशासकीय आदेशानुसार, विजयपुरामधील शाळा, महाविद्यालय, पदवी महाविद्यालय किंवा इतर तत्सम शैक्षणिक संस्थांच्या गेटपासून 200 मीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारची सभा, आंदोलन किंवा निषेध करण्यास मनाई आहे.
सूत्रांनी सांगितलं की, उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. तर शिमोगा कलबुर्गीमध्येही कलम 144 लागू करण्यात आला आहे. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, शहरात 10,000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त राखीव पोलीस दल आणि शहर सशस्त्र राखीव दलही तैनात करण्यात येणार आहेत.
ते म्हणाले की, डीसीपींना सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. उडुपी जिल्ह्यातील याचिकाकर्त्या मुलींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, हिजाब प्रकरणाशी संबंधित प्रकरण मंगळवारसाठी क्रमांक 1 म्हणून सूचीबद्ध केलं गेलं आहे आणि न्यायालय सकाळी 10.30 पासून निकाल देण्यास सुरुवात करेल. दक्षिण कन्नड डीसी राजेंद्र केंद्रीय विद्यालयाने मंगळवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. “बाह्य परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील परंतु सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या अंतर्गत परीक्षा पुढे ढकलण्यात येतील,” असं सांगण्यात आलं.
काय आहे प्रकरण – कर्नाटकच्या उडुपी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेजमध्ये सुरू झालेला हिजाबचा मुद्दा राज्यात एक संकट बनला आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाबशिवाय क्लासेसमध्ये जाण्यास नकार दिला असून न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करू असं म्हटलं आहे. हायकोर्टाने वर्गात हिजाब आणि भगवी शाल किंवा स्कार्फ या दोन्हींवर बंदी घालण्याचा अंतरिम आदेश जारी केला असला तरी, आंदोलन सुरूच आहे. उडुपीमध्ये सुरू झालेला हिजाबचा वाद राज्याच्या इतर भागातही वादाचं कारण ठरला आहे. याशिवाय देशाच्या राजकारणात या प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वादावादी झाली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..